Pune : विहिरीमध्ये पडलेल्या चारी मजुरांचे, मृतदेह चौथ्या दिवशी सापडले

म्हसोबाचीवाडी येथे विहिरीला रिंग (सिमेंटक्रॉक्रिटीकरण चा कठडा) तयार करण्याचे काम गेल्या तीन-चार महिन्यापासुन सुरु होते.
Pune
PuneSakal

वालचंदनगर - म्हसोबाचीवाडी (ता.इंदापूर) येथे १२० फुट खोल विहिरीमध्ये पडलेल्या चारही मजुरांचे मृतदेह आज शुक्रवारी दुपारी सव्वा बारा वाजेपर्यंत सापडले. चार ही मजुर तालुक्यातील बेलवाडी गावातील असल्याने गावावरती शोककळा पसरली.

म्हसोबाचीवाडी येथे विहिरीला रिंग (सिमेंटक्रॉक्रिटीकरण चा कठडा) तयार करण्याचे काम गेल्या तीन-चार महिन्यापासुन सुरु होते. यासाठी बेलवाडी गावातील दहा ते बारा मजूर एका ठेकेदाराकडे रोजंदारीवरती काम करीत होते.

Pune
Pune : अनेक दिवसांपासुन राजुरी परिसरात धुमाकुळ घालणारा बिबट्या; पिंज-यात जेरबंद

मंगळवार (ता.१) रोजी पोर्णिमा असल्यामुळे बहुतांश कामगार देवदर्शनासाठी गोंदावले येथे गेल होते. सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय ३२), जावेद अकबर मुलाणी ( वय ३०, मूळ रा.बेलवाडी, हल्ली रा. निंबोडी), परशुराम बनसीलाल चव्हाण (वय ३०),

लक्ष्मण उर्फ मनोहर मारुती सावंत (वय ५५) हे चौघेजण सकाळी लवकर कामावरती गेले. दुपारनंतर विहिरीच्या रिंगचे काम करीत असताना अचानक मुरुम व मातीचा ढिगारा कोसळल्याने चार मजूर विहिरीमध्ये कोसळले.त्यांच्या अंगावरती मुरुम व माती पडल्याने ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची घटना घडली.

Pune
Bomb Threat for Pune Airport : पुणे विमानतळ बॉम्बनं उडवण्याच्या धमकीनं खळबळ! 72 वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल

घटनेनंतर रात्री लगेच बचाव कार्याला सुरवात झाली.आज शोध मोहिमेचा चौथा दिवस होता. चार दिवसामध्ये पोकलेन मशिनच्या साहय्याने विहिरीच्या परीसरातील माती व मुरुम हटवली. विहिरीतील पाणी व मलबा हटविल्यानंतर चार मजुरांचे मृतदेह एनडीआरएफ च्या जवानांनी बाहेर काढले.

Pune
Pune Crime : कोथरूड परिसरात दहशत पसरविणाऱ्या आरोपीला अटक

बेलवाडी गावावरती शोककळा...

सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय ३२), जावेद अकबर मुलाणी ( वय ३०, मूळ रा.बेलवाडी, हल्ली रा. निंबोडी), परशुराम बनसीलाल चव्हाण (वय ३०), व लक्ष्मण उर्फ मनोहर मारुती सावंत (वय ५५) हे चार मजूर एकाच गावातील होते. संपूर्ण गावच गेल्या तीन पासुन शांत झाले होते.एकाच गावातील चौघांचा दुर्देवी अंत झाल्यामुळे गावावरती शोककळा पसरली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com