
Pune police probe mystery after body found in Ramnadi at Pashan
Esakal
औध डीपी रोडवर पाषाण परिसरात रामनदीत एक मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. रामनदीत मृतदेह असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिलीय. यानंतर पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केल्यानंतर असा अंदाज वर्तवला की मृत्यू पाच ते सहा दिवसांपूर्वी झालेला असावा.