
Pune Book Festival to Return in December with Expanded Scope, Promising an Unprecedented Literary Experience for Book Lovers.
Sakal
पुणे : देशपातळीवर नावाजलेला आणि महाराष्ट्रातील सर्वात भव्य पुस्तक महोत्सव असणारा ‘पुणे पुस्तक महोत्सव’ यंदा १३ ते २१ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे हे सलग तिसरे वर्ष असून मागील दोन वर्षांपेक्षा यंदा त्याची व्याप्ती वाढली आहे. महोत्सवात यावर्षीही पुस्तकप्रेमींसाठी भरगच्च साहित्यिक कार्यक्रमांची पर्वणी असेल.