

Pune Book Festival
sakal
पुणे : गुरू-शिष्य परंपरा... युद्धकला, वेद-उपनिषदे, स्थापत्यशास्त्र अशा समृद्ध भारतीय ज्ञान परंपरेचा जागर करत... भारतीय ज्ञान परंपरेची विपुल ग्रंथसंपदा विराजमान असलेली पालखी अन् त्यासह विद्यार्थ्यांनी सादर केलेली युद्धकलेची चित्तथरारक प्रात्यक्षिके, अशा दिमाखात जवळपास सात हजारांहून अधिक तरुणांनी काढलेल्या ‘ज्ञान सरित ग्रंथ दिंडी’ने पुणे पुस्तक महोत्सवाची नांदी झाली.