

Pune Book Festival
sakal
पुणे : पुणे पुस्तक महोत्सव समारोपाच्या दिवशी वसुंधरा संरक्षणाची शपथ घेण्याचा तिसरा विश्वविक्रम नोंदविण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेल्या ‘पंच प्रण’ याला अनुसरून हा विश्वविक्रम करण्यात आला. यासाठी सहभाग घेतलेल्या हजारो नागरिकांनी वसुंधरा संरक्षणाची शपथ घेतली आणि त्याची नोंद ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली आहे.