

Hearing in Bopodi Land Scam Case
Sakal
पुणे : बोपोडी येथील जमीन प्रकरणात कृषी महाविद्यालयाने उच्च न्यायालयात याचिका सादर करीत दाद मागितली आहे. दरम्यान, या प्रकरणात निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी दिलेला आदेश रद्द करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे शुक्रवारी (उद्या) सुनावणी होणार आहे. त्यासाठी कृषी महाविद्यालय आणि हेमंत गावंडे, तसेच विध्वंस कुटुंबीयांना नोटीस बजावण्यात आली आहे.