Pune:कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वसुलीला ब्रेक

घरपट्टी व पाणीपट्टी : ४२४ कोटींचे उद्दिष्ट
कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सुने झालेले सरकारी कार्यलय...
कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सुने झालेले सरकारी कार्यलय...esakal

पुणे- जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला सरत्या आर्थिक वर्षअखेरपर्यंत ( २०२२-२३) सुमारे ३५० कोटी रुपयांची घरपट्टी व पाणीपट्टी वसूल करण्यात यश आले आहे. यासाठी गेल्या आर्थिक वर्षात आयोजित केलेल्या लोकअदालतींचा चांगला फायदा झाला आहे. मात्र, वसुलीच्या अखेरच्या महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या बेमुदत संपामुळे या कराच्या वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यात अपयश आले.

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्यावतीने गेल्या आर्थिक वर्षातील ग्रामपंचायत कराची ४२४ कोटी रुपयांची वसुली करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. ते पूर्ण करण्यासाठी वर्षभरात तीन ते चार लोकअदालतींचे आयोजन केले होते. त्याचा फायदा ग्रामपंचायत कराची थकबाकी वसूल करण्यासाठी झाल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सुने झालेले सरकारी कार्यलय...
Solapur News : मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागेसाठी 145 अर्ज

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमार्फत गावपातळीवर आपापल्या कार्यक्षेत्रातील कुटुंबांकडून घरपट्टी, पाणीपट्टी व दिवाबत्ती कराची वसुली करण्यात येते. यानुसार दरवर्षी मार्चअखेरपर्यंत जास्तीत जास्त कर वसूल करण्यासाठी प्रयत्न केले जातात.

यासाठी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच मार्च महिन्यात अधिकाधिक वसुली करण्यावर भर दिला जातो. यंदा मात्र याच महिन्याच्या १४ तारखेपासून सर्वच सरकारी कर्मचारी हे बेमुदत संपावर गेले होते. हा संप आठवडाभर चालला आणि त्यानंतर आलेल्या काही सरकारी सुट्यांमुळे यंदाच्या मार्च महिन्यातील केवळ दहा ते बाराच दिवस हे कर वसुलीसाठी मिळाले. याचा परिणाम हा करवसुलीवर झाला आहे. परिणामी कर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यात अपयश आले.

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सुने झालेले सरकारी कार्यलय...
Explore Sangli :  काय? सांगलीतल्या या डोंगरावरनं विजापूरचा गोल घुमट दिसतो!

गेल्या आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२२ ते २८ फेब्रुवारी २०२३ या अकरा महिन्यांत एकूण २८८ कोटींची करवसुली झाली होती. पान २ वर

आंबेगाव, मावळचे यश

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या वतीने गावा-गावांतील घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी आयोजित केलेल्या लोकअदालतीतील तडजोडीतून ग्रामपंचायतींना ३१ कोटी ३९ लाख १ हजार ६३२ रुपयांची थकबाकी वसूल झाली आहे.

जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील सर्वाधिक १२ हजार ८३७ खातेदारांनी मिळून एकूण ४२ लाख २८ हजार ८३२ रुपयांचा कर भरला, तसेच जिल्ह्यात सर्वाधिक ६ कोटी ५६ लाख ८७ हजार ५३५ रुपयांची करवसुलीही मावळ तालुक्यात झाली असल्याचे पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सुने झालेले सरकारी कार्यलय...
Pune Crime News : न घेतलेल्या कर्जाचे हफ्ते अचानक खात्यातून जाऊ लागले; 'हा' प्रकार तुमच्यासोबतही घडू शकतो

ग्रामपंचायत करवसुली दृष्टिक्षेपात

थकबाकीसह कराची एकूण रक्कम- ४२४ कोटी ८० लाख रुपये

घरपट्टीची रक्कम- ३६५ कोटी ८४ लाख रुपये

पाणीपट्टीची थकीत रक्कम - ५८ कोटी ९५ लाख ९० हजार रुपये

एकूण घरपट्टी वसुली- २९१ कोटी ९२ लाख रुपये

एकूण पाणीपट्टी वसुली- ४६ कोटी ३८ लाख रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com