Explore Sangli :  काय? सांगलीतल्या या डोंगरावरनं विजापूरचा गोल घुमट दिसतो!

काय झाडी, काय डोंगर; हे ठिकाण गुहावटीत नाही तर आपल्या पश्चिम महाराष्ट्रात आहे
Explore Sangli
Explore Sangli esakal

मध्यंतरी ठाकरे सरकार पडलं आणि एक नवं सरकार स्थापन झालं. त्यावेळी नव्या सरकारातील एका आमदारांनी ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’ चा डायलॉग प्रसिद्ध केला. त्यावर भरपूर चर्चाही केली. पण, गुहावटीत असताना तिथल्या निसर्ग सौंदर्याचे भरभरून कौतूक करणाऱ्या आमदारांनी अजून आपला महाराष्ट्र एक्सप्लोअर केलेला नाहीय.

कारण, एका पेक्षा एक लोकेशन्स आपल्या महाराषट्रात आहेत. आता तूम्ही ज्या हिल स्टेशनचा फोटो पाहिलात ते आपल्या पश्चिम महाराष्ट्रात आहे. जे अद्याप प्रसिद्धीझोतात आलेले नाही. त्यामूळे त्याबद्दल फारशी कोणाला माहिती नाही.

तर हे तूम्ही पाहिलेलं हिलस्टेशन सांगली जिल्ह्यातल्या कवठे महाकाळ तालुक्यातील दंडोबाच्या डोंगरावर आहे. तालुक्याच्या सीमेवर खरशिंग गावानजिक असलेला दंडोबा डोंगर हे असंच रमणीय ठिकाण आहे.

दंडोबा डोंगरावरील निसर्ग सौंदर्य
दंडोबा डोंगरावरील निसर्ग सौंदर्यesakal

डोंगरावरील मंदिर

पाच ग्रामपंचायतींच्या हद्दीत सुमारे ११५० हेक्टरवर पसरलेल्या या डोंगरावर पुरातन दंडनाथाचं मंदिर असून; सुमारे शंभर ते सव्वाशे फूट पोखरून तयार केलेल्या गुहेतच नागाच्या वेटोळ्यात दंडनाथाची मूर्ती आहे.

डोंगराचे सौंदर्य वाढवणारे शिखर

डोंगरमाथ्यावरचे शिखर आश्चर्यकारक आहे. इथले पुजारी आणि देवस्थानच्या मते हे शिखर मंदिराचं आहे. याची रचना पहिली तर हे लक्षात येतं, की त्याचा उपयोग वॉच टॉवर म्हणूनही करता यावा.

डोंगरावरील उंच शिखर
डोंगरावरील उंच शिखरesakal

हे शिखर पाच माजली असून; सर्वांत वरचा भाग आहे तिथं चार ते पाच माणसं उभी राहू शकतील एवढीच जागा आहे. पहिल्या टप्प्यावर जायला पायऱ्या आहेत, पण तिथून पुढं वरती जायला मानवनिर्मित पायऱ्या नाहीत; सध्या तिथं एक दगड आहे ज्याचा उपयोग करून वरती जाता येतं.

वरती गेल्यावर या परिसरातला अंदाजे साठ ते सत्तर किलोमीटरचा प्रदेश दिसतो. ढग स्वच्छ असतील वातावरण चांगलं असेल तर इथं उभं राहिल्यावर विजापूरच्या गोल-घुमटाचं शिखर दिसतं, असं इथले ग्रामस्थ सांगतात.

दंडोबा डोंगरावरील बसण्यासाठी उभारलेल्या आकर्षक झोपड्या
दंडोबा डोंगरावरील बसण्यासाठी उभारलेल्या आकर्षक झोपड्याesakal

तसं भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर कवठे महाकाळ तालुक्यातून कर्नाटकातील विजापूर १०५ किलोमिटर अंतरावर आहे. विजापूर शहराच्या ईशान्य दिशेस गोल घुमट असून याची उंची २२३ फूट असल्याने फार दुरूनही याचे दर्शन होते, ही शक्यता नाकारता येत नाही.

गोल घुमटाची लांबी १९८ फूट असून रुंदी सुद्धा तेवढीच आहे. गोल घुमटाच्या चारही बाजूना चार मनोरे आहेत आणि मनोऱ्याच्या सहाव्या मजल्यास लागून इमारतीच्या सभोवताली वर्तुळाकार सज्जा आहे. गोल घुमटाची उंची २२३ फूट असली तरी वरील ताज महाल अंतर्भूत केल्यास याची उंची २५० फूट होते.

विजापूरचा गोल घुमट
विजापूरचा गोल घुमटesakal

इथे कसं जायचं


पुणे-सांगली-मिरज-कवठेमहांकाळ-खरशिंगफाटा-दंडोबा डोंगर

अंतर : सुमारे २७५ किमी.

योग्य कालावधी : पावसाळा आणि हिवाळा या दोन्ही ऋतूंमध्ये तूम्ही इथे भेट देऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com