esakal | धक्कादायक : धाकट्या भावाने, थोरल्याला पेट्रोल टाकून पेटवून दिले!
sakal

बोलून बातमी शोधा

crime

घराच्या वादातून धाकट्या भावाने थोरल्या भावाला पेट्रोल ओतून पेटवून देण्याचा प्रकार बारामती तालुक्यातील सुपे येथील काळखैरेवाडी येथे झाला.

धक्कादायक : धाकट्या भावाने, थोरल्याला पेट्रोल टाकून पेटवून दिले!

sakal_logo
By
चिंतामणी क्षीरसागर

वडगाव निंबाळकर (पुणे) : घराच्या वादातून धाकट्या भावाने थोरल्या भावाला पेट्रोल ओतून पेटवून देण्याचा प्रकार बारामती तालुक्यातील सुपे येथील काळखैरेवाडी येथे झाला. उपचारादरम्यान थोरला भाऊ मारुती वसंत भोंडवे (वय ४८) यांचा शुक्रवारी (ता. १४) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. 

पुण्यात धावणार 100 कोरोनामुक्त रिक्षा

सुपे येथील काळखैरेवाडी येथे बुधवारी (ता. १२) रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला होता. धाकटा भाऊ अनिल वसंत भोंडवे (वय ३२) याच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. येथील राजबाग परिसरात दोघेही राहतात. मारूती भोंडवे हे पत्नी सविता, मुलगा महेश व हर्षद यांच्यासोबत पत्र्याच्या घरात असताना आरोपी अनिल हा रात्री घराजवळ आला. त्याने मारुती यांना, तू वेगळे राहा, आमच्यात राहू नकोस, असे म्हणत घराच्या खिडकीच्या काचा फोडून घराच्या दरवाजाची बाहेरून कडी लावली. त्यानंतर खिडकीतून मारूती यांच्या अंगावर पेट्रोल टाकून काडीने पेटवून दिले. या वेळी मारुती यांच्या अंगावरील पेटती कपडे विझविण्यास पत्नी सविता या आल्या. मात्र त्यांना ठिकठिकाणी भाजले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, या प्रकारामुळे आरडाओरडा झाल्यानंतर परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांच्या मदतीने मारुती व सविता यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. पुणे येथील ससून रूग्णालयात गुरूवारी (ता. १३) पोलिसांनी जबाब नोंदवला. मात्र, शुक्रवारी मारुती यांचा मृत्यू झाला. याबाबतचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे हे करत आहेत.