

Lohgaon Police Expose Illegal Marijuana Cultivation in Pune Residence
esakal
पुणे : लोहगाव परिसरातील पठारे वस्ती येथे एका बंगल्याच्या आवारातच गांजाची लागवड करून विक्री करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लोहगाव पोलिसांनी या कारवाईत गांजाची ४१ झाडे, वाहन आणि मोबाईल असा सहा लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.