Fri, March 31, 2023

पुणे: चालक सिगारेट ओढत होता अन् बस पुलावरुन कोसळली, गरोदर महिला जखमी
Published on : 18 March 2023, 7:04 pm
Pune Bus Accident
पुण्यातील बावधन येथे ट्रॅव्हल बस पुलावरून रस्त्यावर कोसळून दोन जण जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. अपघातात गरोदर महिला आणि तिचे लहान बाळ जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गाडीत नेमके किती प्रवासी होते, याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.
मुंबईवरून कर्नाटक कडे निघालेली एका खासगी ट्रॅव्हलची बस बावधनजवळ पुलाचे कठडे तोडून सेवा रस्त्यावर कोसळली. चालक सिगारेट पित होता. त्यावेळेस त्याचे नियंत्रण सुटले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.