Pune by-election : कसब्यात मतदारांनी वाढविली धाकधूक;सकाळी शांतता, सायंकाळी रांगा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune  By Poll Election

Pune by-election : कसब्यात मतदारांनी वाढविली धाकधूक;सकाळी शांतता, सायंकाळी रांगा!

पुणे - कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडले. तरुणवर्गासह ज्येष्ठ मतदारांनीही यामध्ये सहभाग घेत आपला हक्क बजावला. सकाळपासून दुपारर्यंतच्या सत्रात मतदानाचा टक्का कमी होता.

हक्काचा मतदार बाहेर पडला नाही, त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांची धाकधूक वाढत होती. मात्र, जसजशी मतदानाची वेळ संपत आली तशा मतदान केंद्रापुढे रांगा लागल्या.

लोहियानगर, गंज पेठ, महात्मा फुले पेठ, दारूवाला पूल, गुरुवार पेठ यांसह इतर भागांत रांगा लागलेल्या होत्या. चिंचवड मतदार संघातही अशीच स्थिती होती.

बूथवरील कार्यकर्ता बूथ सोडून जाऊ नये यासाठी नाश्‍ता, चहा, जेवण याची व्यवस्था.

पोलिसांकडूनही वृद्ध व इतर मतदारांना मदत

पैसै वाटपाच्या आरोपांमुळे पोलिसांचा कडक बंदोबस्त आणि पेट्रोलिंग सुरू होते

मतदान केंद्रातील मशिन स्लो चालत असल्याच्या तक्रारी

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी व्यावसायिकांकडून ऑफर

मतदार याद्यांमधील घोळ पोटनिवडणुकीतही कायम

विकलांग, अपंगांना मतदान करण्यासाठी सहायता कक्ष

ज्येष्ठांना, अपंगांना मतदानासाठी व्हीलचेअरची सोय

मतदार स्लीप शासकीय कर्मचाऱ्यांकडून घेऊन येण्याचा आग्रह

मतदारांच्या सेल्फी पॉइंटचे प्रमाण

२०१९ च्या तुलनेत कमी

वाकड शाळेतील केंद्र क्रमांक ३९५ व ४०५ आणि रावेत येथील मतदान केंद्र क्रमांक २३ आदर्श मतदान केंद्र