
पुणे : पुणे व खडकी कँटोन्मेंटमधील नागरी परिसर महापालिकेत विलीन करण्यास राज्य सरकारने तत्त्वतः मान्यता दिल्याने कँटोन्मेंटमधील रहिवाशांमध्ये संमिश्र वातावरण आहे. रहिवाशांना विलीनीकरणामुळे महापालिका व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासह पायाभूत सोयीसुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र, संरक्षण विभागाच्या सुरक्षिततेच्या कारणामुळे चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वाढवून मिळणार नसल्याने बांधकामांवर मर्यादा राहणार आहेत. त्यामुळे कँटोन्मेंटवासीयांची ‘कहीं खुशी, कहीं गम’ अशी अवस्था झाली आहे.