पुणे कॅन्टोन्मेट एक ऑगस्टपासून ऑनलाइन सेवा पुरविणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जुलै 2020

-पुणे कॅन्टोन्मेट एक ऑगस्टपासून ऑनलाइन सेवा पुरविणार

-ई-छावणी वेबपोर्टल एक ऑगस्टपासून कार्यान्वित होणार  

कॅन्टोन्मेंट :  कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या संयुक्त व्यवस्थापनासाठी संरक्षण मंत्रालयातर्फे ई-छावणी वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे. या पोर्टलमध्ये पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डासहीत देशातील पाच कॅन्टोन्मेंट बोर्डांचा समावेश केला आहे. येत्या १ ऑगस्टपासून हे वेबपोर्टल प्रत्यक्षात कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे बोर्डाचे कामकाज (व्यवस्थापन) आता ऑनलाइनपद्धतीने होणार आहे. कोविड-१९च्या पार्शभूमीवर हे पोर्टल सुरू होत असल्याने बोर्डाच्या कर्मचार्यांना सुद्धा नागरिकांना ऑनलाइन सुविधा पुरविता येणे शक्य होणार आहे.

असा चेक करा बारावीचा रिझल्ट

ई-छावणी वेबपोर्टलमुळे कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या विविध सुविधा एकाच ठिकाणी नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. देशातील ६२ कॅन्टोन्मेंट बोर्डांसाठी ई-छावणी वेबपोर्टल तयार करण्यात येत आहे. मात्र, सुरवातीला पाच कॅन्टोन्मेंट मध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून ते कार्यान्वित होत आहे. त्यामध्ये पुणे, दिल्ली, सिकंदराबाद, आग्रा, लखनऊ या पाच कॅन्टोन्मेंट बोर्डांचा समावेश आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डांमध्ये ई-गव्हर्नन्सला प्राधान्य देण्यात यावे. या उद्देशानेच संरक्षण मंत्रालयातर्फे ई-छावणी पोर्टल तयार करण्यात आले आहे. त्यामुळे आता बोर्डाच्या हद्दीतील नागरिकांना ट्रेड लायसन्स ऑनलाइन मिळेल. बिल्डींग प्लॅन, वॉटर कनेक्शन यासारखी विविध कामे आता ऑनलाइन होणार आहेत. दिल्ली येथील भारत इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीने हे पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलमुळे कॅन्टोन्मेंटच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजातही अधिकाधिक पारदर्शकता आणण्याचा संरक्षण मंत्रालयाचा प्रयत्न आहे.

येरवडा कारागृहातून पाच कैदी पळाले

कोरोनाच्या काळात नागरिकांनी एकत्रित येण्यापेक्षा, त्यांना ऑनलाइन सेवेचा लाभही मिळणार आहे. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे डेअरी,फळे,भाजीपाला,किराणामालासाठी तसेच हॉटेल आणि रेस्टॉरंटसाठी ट्रेड लायसन्स आता ऑनलाइन देण्यात येणार आहेत.असेही बोर्डातर्फे प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

आईने सांगितला तसा अभ्यास केला आणि बोर्डाच्या परीक्षेत पहिला आला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Cantonment will provide online service from August 1