esakal | बारावीचा निकाल दुपारी 1 वाजता; असा चेक करा रिझल्ट
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra board hsc result 2020 official website

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकाल गुरूवारी (ता. १६) जाहीर होणार आहे.

बारावीचा निकाल दुपारी 1 वाजता; असा चेक करा रिझल्ट

sakal_logo
By
सूरज यादव

पुणे - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकाल गुरूवारी (ता. १६) जाहीर होणार आहे. निकाल दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे. दरवर्षी मे महिन्याच्या शेवटी बारावीचा निकाल जाहीर केला जातो. मात्र यंदा कोरोनाच्या प्रसारामुळे लॉकडाउन जाहीर झाल्याने उत्तरपत्रिका तपासणी आणि त्याच्याशी संबंधित कामे लांबली. त्यामुळे निकाल जुलैमध्ये जाहीर होईल, असे शिक्षण विभागाने सांगितले होते. त्याप्रमाणे हा निकाल जाहीर होत आहे.

असा पाहा निकाल
बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी दुपारी एक वाजता बोर्डाच्या संकेतस्थळावर जाहीर होणार आहे. निकाल पाहण्यासाठी http://mahresult.nic.in/ वर क्लिक करा. याशिवाय mahresult.nic.in आणि results.nic.in वर पाहता येणार आहे. तुमचा बैठक क्रमांक आणि इतर माहिती भरल्यानंतर ती सबमिट करावी लागेल. त्यानंतर निकाल दिसेल. या निकालाची तुम्हाला प्रिंटही काढता येणार आहे.

हे वाचा - जुळ्या बहिणींची कमाल! सर्व विषयात मिळवले सेम टू सेम गुण

राज्य मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. बारावीची लेखी परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या दरम्यान घेण्यात आली होती. यावर्षी राज्यभरातून एकूण १५ लाख पाच हजार २७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यात आठ लाख ४३ हजार ५५२ विद्यार्थी आणि सहा लाख ६१ हजार ३२५ विद्यार्थिंनी आहेत. परीक्षेसाठी नऊ हजार ९२३ कनिष्ठ महकाविद्यालयातून विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या परीक्षेसाठी राज्यात एकूण तीन हजार ३६ परीक्षा केंद्रे होती.

हे वाचा - मार्कांपेक्षा आयुष्य मोठं! केमिस्ट्रीला 24 गुण मिळालेल्या IAS अधिकाऱ्याचं मार्कलिस्ट पाहा

निकालाचा तपशील पुढीलप्रमाणे 
- ऑनलाईन निकालानंतर दुसऱ्या दिवसांपासून गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागीय मंडळाकडे ऑनलाईन अर्ज करता येणार.
- हे अर्ज मंडळाच्या ‘http://verification.mh-hsc.ac.in‘ या स्थळावरुन स्वतः किंवा शाळा? महाविद्यालयामार्फत करता येतील.
- गुणपडताळणीसाठी १७ ते २७ जुलै पर्यंत, तर छायाप्रतीसाठी १७ जुलै ते ५ ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार (शुल्क ऑनलाईन)
- पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत अनिवार्य असून ही प्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत विहित शुल्क भरून ऑनलाईन अर्ज करता येईल.
- बारावीच्या परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी/ गुणसुधार योजनेअंतर्गत उपलब्ध.