Chandan Nagar Pune crime news
esakal
पुणे : वकिलाचे सेक्रेटरीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून धक्कादायक खूनप्रकरण समोर आले आहे. वकील, त्याची पत्नी आणि अल्पवयीन मुलीने मिळून सेक्रेटरीला कार्यालयातच दोरीने बांधून, धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना जुना मुंढवा रस्ता, हॉटेल संदीपच्या शेजारी (Chandan Nagar Crime) असलेल्या ॲड. संजय सावंत यांच्या कार्यालयात १६ एप्रिल रोजी घडली असून १७ एप्रिल रोजी ती समोर आली.