पुण्यात विनयभंगाच्या प्रकरणात पीडित मुलगी आणि पित्यावरच होणार गुन्हा दाखल

पुण्यात विनयभंगाच्या प्रकरणात पीडित मुलगी आणि पित्यावरच होणार गुन्हा दाखल

पुणे : तरुणाने पाठलाग केला म्हणून त्यावर अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र हे प्रकरण न्यायालयात गेले तेव्हा मुलगीने खोटी साक्ष दिली. तर तिचे वडिल देखील फितूर झाले. त्यामुळे आरोपीची निर्दोष मुक्तता झाली. म्हणून न्यायालयात साक्ष देताना फितूर झालेल्या मुलीसह तिच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अतिरीत्र सत्र न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी न्यायालयातील नाझर यांना हा आदेश दिला. दोघांविरोधात कलम १९१ (खोटी साक्ष देणे) नुसार गुन्हा दाखल होणार आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की, शिरूर तालुक्यातील १७ वर्षीय तरुणी ही बसने कॉलेज जात. त्यावेळी आरोपी तिचा पाठलाग करीत ‘तू मला आवडते’ असे म्हणाला होता. तसेच एक दिवस त्याने तिला मिठी मारली होती. मात्र मुलीने त्याला सांगितले की ‘माझे तुझ्यावर प्रेम नाही. त्यामुळे मला त्रास देऊ नको’. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने मुलगी आणि तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. दोन वर्ष हा प्रकार सुरू होता. त्यानंतरही मुलाचा त्रास सुरू असल्याने मे २०१७ रोजी मुलीने रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पुण्यात विनयभंगाच्या प्रकरणात पीडित मुलगी आणि पित्यावरच होणार गुन्हा दाखल
प्रेमाला अडथळा निर्माण झाल्याने प्रेमीयुगलांनी गाठले पुणे

आरोपीने माझा पाठलाग केलाच नाही : मुलीची साक्ष

या खटल्यात सरकारी वकील अरुंधती ब्रम्हे यांनी पाच साक्षीदार तपासले. त्यात मुलीची आणि तिच्या वडिलांची साक्ष महत्त्वाची होती. मात्र दोघेही फितूर झाले व त्यांची न्यायालयात खोटी साक्ष दिली. आरोपीने माझा पाठलाग केलाच नाही, असे मुलीने न्यायालयात सांगितले. त्यामुळे पुराव्याअभावी आरोपीची सुटका करण्यात आली. मात्र पोलिसांनी केलेला तपास आणि मुलीने प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांसमोर दिलेला जबाब यावरून तीन न्यायालयात खोटी साक्ष दिल्याचे न्यायालयात लक्षात आले.

मुलीला आलेले स्थळ पाठवले होते परत :

लग्न करायचे असल्याने संबंधित मुलीला पाहण्यासाठी स्थळ आले होते. आरोपींने त्या स्थळातील माणसांना भेटून ‘मी आणि मुलगी पळून जाणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाचे लग्न तिच्याबरोबर लागून देवू नका’ असे सांगितले. त्यामुळे तिला आलेले स्थळ परत गेले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com