पुणे : जात वैधता प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांसह पालकांना मनस्ताप

विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र आणि मूळ कागदपत्रे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
जात वैधता प्रमाणपत्र
जात वैधता प्रमाणपत्रSakal

पुणे : महाविद्यालयांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र आणि मूळ कागदपत्रे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यातच जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी ऑनलाइन प्रणालीमधील तांत्रिक अडचणी आणि ऑफलाइनची मुदत संपल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (बार्टी) जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी ऑनलाइन प्रणाली आहे. परंतु मागील आठवड्यात तांत्रिक त्रुटीमुळे जात पडताळणीचे कामकाज ठप्प झाले होते. त्यामुळे शैक्षणिक कामकाजासाठी १७ ते २५ नोव्हेंबरदरम्यान ऑफलाइन अर्जही स्वीकारण्याच्या सूचना बार्टीच्या वतीने देण्यात आल्या होत्या.

जात वैधता प्रमाणपत्र
पुणे : 'स्वच्छ'ला काम मिळताच कर्मचाऱ्यांच्या साहित्य खरेदीचा मुहुर्त

परंतु सध्या ऑनलाइन प्रणालीचा मंदावलेला वेग, समित्यांच्या कामकाजाचे नियोजन आणि कर्मचाऱ्यांचा अभाव यामुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत आहे.जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास महाविद्यालयाकडून खुल्या प्रवर्गातून प्रवेश घ्या किंवा खुल्या प्रवर्गातील शुल्क भरा, अशी सक्ती करण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विद्यार्थ्यांची गर्दी वाढली आहे. परिणामी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र कमी कालावधीत कसे द्यावे, असाही प्रश्न समित्यांसमोर निर्माण झाला आहे.

दुसरीकडे निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. आरक्षित जागांसाठी जात पडताळणीचे अर्ज प्राप्त होत आहेत. राज्य सरकारने या उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे निवडणुकीतील उमेदवारांना सवलत आणि विद्यार्थ्यांना सक्ती हा दुजाभाव कशासाठी, असा प्रश्न पालकांकडून विचारला जात आहे.

जात वैधता प्रमाणपत्र
पुणे : अग्निशमन दलात कंत्राटी कर्मचारी घेण्याची नामुष्की

पावतीवर विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा

जात पडताळणीसाठी प्रस्ताव दाखल केल्यानंतर पावतीवर विद्यार्थ्यांनाही प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनाच का सक्ती करण्यात येत आहे. तसेच, कुटुंबातील व्यक्तीचे जात वैधता प्रमाणपत्र असूनही नियमावर बोट ठेवून कागदपत्रांची मागणी केली जात आहे. त्यामुळे पालकांमध्ये नाराजीचा सूर आहे

‘बार्टी’ची ऑनलाइन जात पडताळणी प्रणाली पूर्ववत सुरळीत झाली आहे. त्यामुळे ऑनलाइन अर्ज दाखल करता येतील. तरीही राज्यात कोठे अडचण आल्यास विद्यार्थ्यांचे ऑफलाइन अर्ज स्वीकारावेत, अशा सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना वेळेत प्रमाणपत्र उपलब्ध व्हावे आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याबाबत खबरदारी घेण्यात येत आहे.

- धम्मज्योती गजभिये, महासंचालक ‘बार्टी’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com