
Pune's CCTV Project Faces Backlash as Contractor's Reckless Digging Wreaks Havoc on Traffic.
Sakal
पुणे : पोलिसांकडून शहरात २ हजार ८८६ नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यासाठी खोदाई सुरु झाली असली त्यात पोलिसांचा ठेकेदार आणि महापालिकेचा समन्वय नसल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले आहे. दिवाळीत खोदाई बंदी केली असली तरी दिवाळीनंतर हे काम पुन्हा सुरु होणार आहे. त्यावेळी महापालिकेच्या पथम विभागाने खोदाई कुठे करावी याचे मार्किंग केले आहे तेथूनच खोदाई करावी लागणार आहे.