
Pune Accident News: बेदरकारपणे डंपर चालवून लोकांना चाकाखाली घेण्याचे प्रकार पुण्यामध्ये वाढले आहेत. शुक्रवारी असाच भीषण अपघात झाला आणि कामावर निघालेल्या भारती मिश्रा यांचा सिमेंट मिक्सरच्या चाकाखाली जीव गेला. दहा महिन्यांमध्ये पाच जणींना प्राण गमवावे लागले आहेत. यात काही महिला तर काही अल्पवयीन मुली आहेत. हिंजवडी, पिंपरी चिंचवड येथील मुख्य रस्त्यांवर कायदा धाब्यावर बसवून दिवसाढवळ्या बेलगाम वाहनं सुरु आहे. मोठमोठे बिल्डर्स, नेत्यांचे समर्थक यांच्या आशीर्वादाने अशी वाहतूक सुरु असल्याचा पीडित कुटुंबियांचा आणि स्थानिकांचा आरोप आहे. विशेष म्हणजे पुण्यात डझनभर आमदार, अनेक मंत्री असताना एकही नेता यावर चकार शब्द बोलायला तयार नाही.