पुणे संघास 53 हजारांचे तर बारामतीच्या संघास 33 हजारांचे पारितोषिक बारामती अँग्रोचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या लीगमध्ये पुणे, कोल्हापूर, नाशिक, पंढरपूर, सातारा आदी ठिकाणच्या 19 संघांनी सहभाग नोंदविला. दरम्यान पुढील वर्षापासून दरवर्षी या लिगचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती क्रिकेटपटू धीरज जाधव यांनी दिली.
बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त येथे आयोजित साहेब प्रिमिअर लीग ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत पुण्याच्या सेंच्युरियन क्रिकेट क्लबने विजेतेपद पटकाविले.
बारामतीच्या धीरज जाधव क्रिकेट अकादमीने अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली. मात्र अंतिम सामन्यात पुणेकरांनी बारामतीकरांवर 125 धावांनी मात केले. अंतिम सामन्यात पुण्याच्या धीरत पतंगारे याने नेत्रदीपक खेळ करत 114 धावा कुटल्या. राहुल देशमुखने 19 धावांच्या बदल्यात तीन खेळाडू बाद केले.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
पुणे संघास 53 हजारांचे तर बारामतीच्या संघास 33 हजारांचे पारितोषिक बारामती अँग्रोचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या लीगमध्ये पुणे, कोल्हापूर, नाशिक, पंढरपूर, सातारा आदी ठिकाणच्या 19 संघांनी सहभाग नोंदविला. दरम्यान पुढील वर्षापासून दरवर्षी या लिगचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती क्रिकेटपटू धीरज जाधव यांनी दिली.
दरम्यान येत्या 22 ते 26 डिसेंबर दरम्यान ट्वेंटी ट्वेंटीच्या धर्ती टी 12 ही 24 षटकांची मालिका बारामतीत खेळवली जाणार असल्याचेही धीरज जाधव यांनी नमूद केले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सूचनेवरुनच या सामन्यांचे आयोजन केल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रत्येकी बारा षटकांच्या सामन्यांना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननेही मान्यता दिली आहे.
हेही वाचा- नाताळ, नववर्षासाठी BMC कडून सोमवारी नियमावली जाहीर होणार
दोन बारामतीकरांची रणजीच्या संभाव्य संघात निवड....
धीरज जाधव क्रिकेट अकादमीत खेळणा-या सुजित उबाळे व स्वराज वाबळे या दोघांची रणजीच्या आगामी संभाव्य संघात निवड झाली आहे. अंतिम सामन्यात त्यांची कामगिरी उत्तम झाल्यास त्यांना रणजी सामन्यात खेळण्याची संधी मिळू शकेल.