Chakan Traffic : चाकणची कोंडी फोडण्यासाठी पीएमआरडीएच्या प्रयत्नांना गती; मोजणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार

PMRDA News : औद्योगिक वाहतुकीच्या तणावाखाली असलेल्या चाकण परिसरासाठी पीएमआरडीएने बाह्य वळण रस्त्याच्या मोजणीला सुरुवात करून वाहन कोंडीच्या समस्येवर ठोस पावले उचलली आहेत.
Chakan Traffic

Chakan Traffic

Sakal

Updated on

पिंपरी : औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या चाकण परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) प्रयत्नांना गती दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चाकणला नुकतीच भेट देऊन अतिक्रमणांवर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर प्रशासनाने बाह्य वळण रस्त्यासाठी जमिनींची मोजणी करण्याचा निर्णय घेतला असून या महिन्यात प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com