Pune Crime : पुणे हादरलं ! प्रेमप्रकरणातून तरुणीचा गळा ब्लेडने चिरला; रक्तबंबाळ अवस्थेत भावाला व्हिडिओ कॉल अन्... आरोपी अटकेत

Love Affair Violence : जखमी अवस्थेतही तरुणीने भावाला फोन व व्हिडिओ कॉल करून घटनेची माहिती दिली. गंभीर जखमी तरुणीवर खासगी रुग्णालयात ICU मध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तरुणीने लिहिलेल्या नावावरून आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला.
Injured 22-year-old woman receiving critical care after a brutal blade attack in Pune’s Chandan Nagar area following a relationship dispute.

Injured 22-year-old woman receiving critical care after a brutal blade attack in Pune’s Chandan Nagar area following a relationship dispute.

esakal

Updated on

पुण्यातील चंदननगर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादातून २२ वर्षीय तरुणीचा गळ्यावर ब्लेडने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. जखमी तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी दिलीप राठोड (२२) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com