मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यातील चंदन नगर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केलं. मात्र, एकीकडे उद्घाटन सुरु असताना दुसरीकडे तिघांनी या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सराफा दुकानात दरोडा टाकला. आरोपींनी याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या आशापुरा ज्वेलर्समधून तीन ग्रॅम सोनं लुटलं. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, नव्याने उद्घाटन झालेल्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.