Pune : रॅगिंग प्रतिबंधात्मक प्रतिज्ञापत्राच्या कार्यपद्धतीत बदल

विद्यापीठ अनुदान आयोगाकडून नवीन कार्यपद्धती जाहीर
UGC
UGCsakal

पुणे : देशभरातील महाविद्यालयात किंवा विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून रॅगिंग प्रतिबंधात्मक प्रतिज्ञापत्र घेण्यात येते. परंतु आता विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) या रॅगिंग प्रतिबंधात्मक प्रतिज्ञापत्र देण्याच्या कार्यपद्धतीमध्ये बदल केला आहे.

या नव्या कार्यपद्धतीतील बदलाची माहिती आयोगाने परिपत्रकाद्वारे दिली आहे. आयोगाच्या रॅगिंग प्रतिबंधक अधिनियमातील तरतुदीनुसार विद्यार्थी आणि पालकांनी प्रत्येक शैक्षणिक वर्षात ‘www.antiragging.in’ आणि ‘www.amanmovement.org’ या संकेतस्थळावरील ऑनलाइन अर्ज भरून द्यावा लागतो. मात्र या प्रक्रियेतील ताण कमी करण्यासाठी आयोगाने कार्यपद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नव्या कार्यपद्धतीनुसार विद्यार्थ्यांना याच दोन संकेतस्थळावरील रॅगिंग प्रतिबंधात्मक नियमावली वाचून आणि समजून घेऊन स्वत:ची माहिती भरावी लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या ई-मेलवर नोंदणी क्रमांक आणि संबंधित लिंक मिळणार आहे. विद्यार्थ्यांला ती लिंक त्यांच्या महाविद्यालयातील किंवा विद्यापीठातील नोडल अधिकाऱ्यांना पाठवावी लागणार आहे. या अधिकाऱ्यांना ई-मेलद्वारे आलेल्या लिंकवर विद्यार्थ्यांची माहिती अर्ज उपलब्ध होणार आहे.

UGC
भारताचं 'पॅक-अप', न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये; अफगाणिस्तानही बाहेर

तसेच महाविद्यालये आणि विद्यापीठांना प्रवेश अर्जात ‘रॅगिंग प्रतिबंधात्मक प्रतिज्ञापत्र संदर्भ क्रमांक’ हा नवीन कॉलम उपलब्ध करून देणे अनिवार्य करण्यात आले आहे, असे आयोगाने परिपत्रकात नमूद केले आहे. आयोगाने नव्या कार्यपद्धतीतील बदलाची माहिती परिपत्रकाद्वारे दिली असून आयोगाच्या संकेतस्थळावर हे परिपत्रक उपलब्ध आहे. ही नवीन कार्यपद्धती देशातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये यांना लागू असेल, असे आयोगाने परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com