Pune : शिवण्यात रंगला छटपूजा सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pooja

Pune : शिवण्यात रंगला छटपूजा सोहळा

खडकवासला : शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे, न्यू कोपरे व एनडीए, खडकवासला,कर्वेनगर, वारजे येथील हजारो महिलांनी शिवणे येथील दांगट पाटील नगर येथील मुठानदीत रविवारी मावळत्या सूर्याला अर्घ्य वाहून सोमवारी उगवत्या सूर्याला नमन करून छटपूजेची हजारोंच्या उपस्थितीत छटपूजेचा सोहळा रंगला होता. शिवणे येथील सार्वजनिक छट पूजा मंडळ, सचिन विष्णुपंत दांगट- पाटील मित्र परिवार भाजपच्या महिला आघाडी यांच्या वतीने कार्यक्रर्माचे आयोजन केले होते.

शिवण्यात मुठानदी किनारी छटपूजा करण्यासाठी जागेचे सपाटीकरण, जाण्यासाठी रस्ता, पूजेला बसण्यासाठी लाल गालिचा अंथरला होता. मातीचा चौथरा करण्यासाठी माती उपलब्ध करून दिली होती. महिलांसाठी कपडे बदलण्याची जागा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्टेज लाईट, व्यवस्था अशी व्यवस्था वारजे प्रभाग समितीचे माजी स्वीकृत सदस्य सचिन दांगट, भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा ममता दांगट यांनी केली होती.

शिवणे सार्वजनिक छट पूजा समिती अध्यक्ष रामसिंग गौतम, उपाध्यक्ष रामनवमी सहानी, सचिव रामधनी यादव, उपसचिव रामसकल शर्मा, कोषाध्यक्ष धर्मेंद्र सिंह, उपकोषध्यक्ष रामबाबू शर्मा, कार्याध्यक्ष मदन शर्मा उपकार्याध्यक्ष रमेश सहानी, सदस्य श्रीनाथ साळुंखे, रामअवतार सहानी, सुरेंद्र यादव, विनोद सिंह, मनोज सिंह, मनोज सिन्हा, संजय सहानी, अतुल सहानी, अजय शर्मा, रंजीत शर्मा, रामदेव शर्मा यांनी याचे आयोजन केले होते. निखील दांगट, सचिन दशरथ दांगट, अभिजित धावडे, यज्ञेश पाटील, उपस्थित होते. यावेळी भोजपुरी, बिहारी, उत्तर प्रदेश, झारखंड, मधील अनेक कुटुंब येथे जमले होते. तसेच भोजपुरी व बिहारी, हिंदी गाण्याचा कार्यक्रम येथे उत्सव समितीने आयोजित केला होता. शिवणे वारजे परिसरातील छटपूजेला खासदार सुप्रिया सुळे व त्यांच्या समवेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

दिवाळीच्या नंतर तिसऱ्या दिवसापासून छटपूजेच्या व्रत सुरु होते. सहाव्या दिवशी सकाळी याची समाप्ती होते. नदीच्या पाण्यालगत मातीचा चौथरा करून छटमातेची प्रतिमा ठेवली जाते. ऊस उभे करून, दिवा, उदबत्ती लावली जाते. त्यानंतर देवाचा नैवद्य विविध फळे, टोपली किंवा सुपात घेऊन महिला पाण्यात उभ्या राहतात. अशी पूजा केली जाते.

-मीना सहानी, भाविक

शनिवारी दुपारी चार वाजल्या पासून या महिला पूर्ण वाढलेला ऊस त्याचबरोबर तसेच पूजेचे इतर साहित्य घेऊन आल्या होत्या. रविवारी मावळतीच्या सूर्याला सोमवारी उगवत्या सूर्याला नमन करण्यासाठी पुन्हा वाहत्या पाण्यात राहतो. कुटुंबात सुख, शांती, भरभराटी व्हावी. यासाठी आम्ही व्रत केले.

-दुर्गा औटी सिंग, भाविक

समितीच्या शिवण्यात नऊ वर्षापासून आयोजन करते. पूर्वी धरणाच्या पाण्यालगत महिला छट पुजा करीत होत्या. आता दांगट पाटील नगर येथे नदीपात्रात कार्यक्रम घेतो.

-रामसिंग गौतम, अध्यक्ष सार्वजनिक छट पूजा समिती

मागील नऊ वर्षापासून छटपुजेचा आयोजन करतो. मला राजकीय दृष्ट्या होणारी प्रगती हि छट मातेचा मला आशीर्वाद मिळाल्याचे असे मी समजतो. पुढील वर्षीपासून जास्तीत जास्त चांगले नियोजन केले जाईल."

-सचिन दांगट पाटील, आयोजक