

Pune Municipal’s Chindhi waste project faces delay; budget allocation under 72B rule blocked.
Sakal
पुणे : महापालिकेने कचऱ्यातील चिंध्या, लेदर, गाद्यांवर प्रक्रिया करण्यासाठी ७५ टन क्षमतेचा प्रकल्प सुरू करण्यास मे महिन्यात अतिशय गडबडीमध्ये मान्यता दिली होती. मात्र, या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करू नये यासाठी ७२ ब हा निर्णय दप्तरी दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रकल्प आता जवळपास कचऱ्यातच गेला आहे. दरम्यान,या प्रकल्पाच्या प्रक्रियेवरच संशय असे वृत्त ‘सकाळ’ने ३१ मे २०२५ रोजी दिले होते.