
पुणे : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच (फिरते खंडपीठ) पुण्यात व्हावे, यासाठी पुण्यातील वकिलांनी पुन्हा कंबर कसली आहे. खंडपीठाची मागणी पूर्ण व्हावी म्हणून सरन्यायाधीश आणि राज्यपालांना अल्टिमेटम दिला आहे. गेल्या चार दशकांहून अधिक वर्षे प्रलंबित असलेली मागणी कधी पूर्ण होणार, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.