
पुणे: पुण्यात शनिवार आणि रविवार या दोन्ही प्रत्येकी दोनशेहून अधिक कोरोना सापडल्याने भेदरलेल्या पुणेकरांना सोमवारी आढळून आलेल्या नव्या १०२ रुग्णांमुळे थोडा दिलासा मिळाला खरा; मात्र, या दिवसभरात केलेल्या १ हजार ४१९ नागरिकांपैकी पाचशे जणांचे अहवाल अद्याप आलेले नसल्यानेच नव्या रुग्णांचा आकडा कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रुग्ण कमी होत असल्याचा समज करण्यापेक्षा पुणेकरांना आणखी सावध राहून स्वत:सह इतराचीही खूप काळजी घ्यावी लागणार आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पुण्यात कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर सुरवातीला रोज ४०० ते ४५० नागरिकांची तपासणी करण्यात येत होती. त्यानंतर तपासणीची संख्या ६०० पर्यंत गेली आणि आता ती रोज १३०० ते १६०० पर्यंत करण्यात येत आहे. मात्र, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) क्षमता नऊशे इतकीच असल्याने बहुतांशी नागरिकांच्या अहवाल दुसऱ्या दिवशी होत आहेत. त्यामुळे सध्या रुग्ण वाढीचा वेग कायम आहे; पण तो अहवाल उपलब्ध होत नसल्याने कमी-अधिक प्रमाणात दिसत आहेत. परंतु, गेल्या वीस दिवसांपासून रोज शंभरच्या घरात रुग्ण सापडत आहेत. मात्र, जेव्हा लॉकडाउनमध्ये शिथिलता आणली गेली; त्यानंतरच्या पाच दिवसांत ही संख्या शंभरच्या पुढे गेल्याची आकडेवारी आहे. या काळात रोज साधारपणे १२२, १३८ आणि त्यातील सर्वाधिक १६६ रुग्ण आढळून आले. त्यानंतर ही संख्या थोडी कमी होऊन ती पुन्हा शंभरच्या घरातच राहिली. त्यानंतर मात्र हा आकडा काही कमी झाला नाही. त्यानंतर गेल्या दोन दिवसांत २०२, २०१ रुग्ण सापडले आणि कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली. तेवढ्यात सोमवारी मात्र, १०२ रुग्ण सापडल्याने पुणेकरांत समाधान दिसून आले. ही संख्या कमी झाल्याने पुणेकरांनी आपला रस्त्यावर येण्यापासून मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग या बाबीकडे दुर्लक्ष करू नये, रुग्णा संख्या कमी झाली तरी पुढचे काही दिवस सर्वच पातळ्यांवर काळजी घ्यावी लागणार आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे म्हणाले, "केवळ रुग्णांनी नव्हे सामान्य नागरिकांनी घरापासून रस्त्यांवर येणाऱ्या प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. सध्या रुग्ण वाढत आहे. त्याववर नियंत्रणाची जबाबदारी सगळ्यांचीच आहे."
कोरोनाची प्रत्येक बातमी ठरतेय पुणेकरांसाठी महत्त्वाची; कारण...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.