पुणेकरांनो, रक्तदानासाठी पुढे या!

Pune Citizens should come forward for blood donation
Pune Citizens should come forward for blood donation

पुणे : अभूतपूर्व रक्त तुटवड्यातून मार्ग काढण्यासाठी शहरातील संस्था आणि संघटना पुढे सरसावत असल्याचे चित्र शनिवारी दिसले. रक्तदान शिबिरांचे प्रत्यक्ष नियोजन आणि त्याला चांगला प्रतिसाद, हाच शहरातील रक्ताच्या तुटवड्यावरचा प्रभावी उपाय असल्याचे मत रक्तपेढ्यांनी नोंदविले. त्यामुळे पुणेकरांनो रक्तदान करा, असे आवाहन रक्तपेढ्यांनी केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील रक्ताच्या तुटवड्यावर "सकाळ'मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. या वृत्ताच्या मदतीने रक्ताच्या तुटवड्याची गंभीर समस्या रक्तदान शिबिरांचे नियमित आयोजन करणाऱ्यांपर्यंत पोचण्यात आली. तसेच, शहरातील संस्था आणि संघटनांनी पुढे येऊन रक्तदान शिबिरांबाबत रक्तपेढ्यांशी चर्चा केली. शहरातील रक्ताची मागणी आणि रक्त संकलन यात मोठी तफावत झाली आहे. ती भरून काढण्यासाठी तातडीने रक्तदान शिबिर भरविणे हाच परिणामकारक मार्ग असल्याचे रक्तपेढ्यांतर्फे स्पष्ट करण्यात आले.
केईएम रुग्णालयाच्या रक्तपेढीचे प्रमुख डॉ. आनंद चाफेकर म्हणाले, ""सकाळच्या वृत्ताच्या आधारावर रक्तपेढीतील जनसंपर्क अधिकाऱ्यांनी रक्तदान शिबिर आयोजकांशी संपर्क साधला. त्यातील काही संस्थांनी शिबिर आयोजनाबद्दल सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. संस्थेतील सदस्यांशी बोलून लवकरच शिबिर घेऊ असे आश्वासन मिळाले.''
शहरातील रक्ताच्या तुटवड्याची स्थिती किती गंभीर आहे, याची माहिती या वृत्ताच्या आधारे रक्तदात्यांपर्यंत पोचविली, असल्याचे सह्याद्री रुग्णालयातील रक्तपेढीच्या डॉ. स्मिता जोशी यांनी स्पष्ट केले.

पत्रकारांच्या विमा संरक्षणाबाबत उपमुख्यमंत्र्यांनी दिले संकेत; अधिवेशनात मांडणार मुद्दा

जनकल्याण रक्तपेढीचे कार्यकारी संचालक डॉ. अतुल कुलकर्णी म्हणाले, ""ही बातमी वाचून काहीजण तीन ते चार रक्तपेढीमध्ये रक्तदान करायला आले होते. तसेच काही जणांनी व्हाट्‌सअप ग्रुपवरती सुद्धा तुटवड्याची चौकशी केली. तसेच, काहींनी रक्तपेढ्यांमध्ये येत्या रविवारची (ता. 6) वेळ रक्तदानासाठी घेतली आहे.''
कोणत्याही संस्था किंवा संघटनांशी न जोडलेल्या नागरिकांनीही रक्तदानाची इच्छा व्यक्त करणारे दूरध्वनी रक्तपेढ्यांना केले. त्यांनी रक्तदानाची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी काही दात्यांनी रक्तपेढ्यांमध्ये वेळाही घेतल्या. मात्र, प्रत्यक्ष रक्तदान होईपर्यंत रक्ताची गरज भागणार नाही. त्यामुळे नागरिकांनी रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान करण्याचे आवाहन रक्तपेढ्यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com