
पुणे - कोरोनामुळे लॉकडाउन असले तरी, हार न मानता ‘स्वच्छ’चे सुमारे ३ हजार ५०० कचरा वेचक फिल्डवर असल्यामुळे शहरात कोठेही कचर्याचे ढिग साठले नाहीत. या काळातही त्यांनी प्रत्येकी दरमहा किमान १० हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले अन् सार्वजनिक आरोग्य राखण्याचेही उद्दिष्ट गाठले. या काळात स्वच्छचे सुमारे ९० टक्के कचरावेचक कामावर उपस्थित होते, अशीही माहिती आता पुढे आली आहे.
घरोघरी फिरून कचरा गोळा करून तो प्रक्रिया प्रकल्पांपर्यंत पोचविण्यासाठी महापालिकेने २०१६ मध्ये स्वच्छ या संस्थेची नियुक्ती केली आहे. या संस्थेचे कचरावेचक प्रती कुटुंब महापालिकेने ठरवून दिलेले शुल्क घेतात. त्या बदल्यात त्या कुटुंबातील कचरा ते गोळा करतात आणि महापालिकेच्या प्रक्रिया प्रकल्पांपर्यंत पोचवितात. लॉकडाउन काळातही संस्थेचे कचरा वेचक सक्रिय होते. त्यासाठी महापालिकेने त्यांना विशेष पास दिले होते. मात्र, प्रतिबंधित क्षेत्रात जे भाग सील होते तेथे त्यांना काम करता आले नाही.
प्रत्येक कुटुंब किंवा दुकानदारांकडून मिळणारे शुल्क कचरा वेचकांना थेट स्वत-ला मिळते. तसेच गोळा होत असलेल्या कचर्यातून सुका कचरा ते भंगार व्यावसायिकांना विकतात. प्रत्येक कचरा वेचक त्याच्या क्षमतेनुसार १०० ते १५० कुटुंबांचा कचरा गोळा करतो. त्यातून किमान १० हजार रुपये आणि सुका कचरा विकून त्याला किमान ३ हजार रुपये मिळतात. महापालिकेत गेल्यावर्षी समाविष्ट झालेल्या ११ गावांमध्ये ‘स्वच्छ’ने काम सुरू केले आहे. शहराच्या मध्यभागातील वस्ती विभाग तसेच गंगाधाम- मार्केटयार्ड, सॅलिसबरी पार्क, मॉडेल कॉलनी आणि उपनगरांतील काही भाग सोडला तर, ‘स्वच्छ’ शहरात सुमारे ७२ टक्के भागांपर्यंत पोचली आहे. कोरोनाच्या काळात महापालिकेने कचरा वेचकांना ग्लोव्हज आणि मास्क, साबण तसेच कपडे धुवायची पावडर पुरविली आहे.
कचर्याचे प्रमाण घटले
शहरात एरवी दररोज सुमारे २१०० टन कचरा गोळा होत असे. परंतु, लॉकडाउनमुळे दुकाने, हॉटेल तसेच विविध व्यावसायिकांचे व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे कचर्याचे प्रमाण घटले असून दररोज सुमारे १६०० टन कचरा गोळा होत आहे. त्यातील सुमारे १२०० टन कचर्याचे संकलन ‘स्वच्छ’ करीत आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
शहरातील बहुतांश भागात कार्यरत
- ‘स्वच्छ’चे शहरातील कचरा वेचक ३५००
- स्वच्छतर्फे कचर्याचे संकलन - रोज सुमारे १२०० टन
- कचरा वेचकांना मिळणारे प्रती युनिट दरमहा उत्पन्न - वस्ती विभाग ५० रुपये, सदनिका ७० रुपये, दुकाने १४० रुपये
- प्रत्येक कचरा वेचकाचे दरमहा सरासरी उत्पन्न - १० ते १२ हजार रुपये
- शहराच्या सुमारे ७२ टक्के भागात ‘स्वच्छ’ सक्रिय
कचरा वेळेत गोळा झाला आणि त्यावर प्रक्रिया झाली तर, सार्वजनिक आरोग्य राखले जाते. हे या पूर्वीही सिद्ध झाले आहे. त्यामुळे संस्था दिवसेंदिवस आपले कार्यक्षेत्र विस्तारत असून त्याला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या बाबत महापालिकाही प्रोत्साहन देत आहे.
- हर्षद बर्डे , संचालक, ‘स्वच्छ’
कचरा वेचकांच्या कामगिरीमुळे शहरात कोठेही कचर्याचे ढिग साठले नाहीत. कचरा वेचकांच्या आरोग्याची महापालिकेने काळजी घेतली आहे आणि त्या बाबत विविध उपाययोजना सुरू आहेत.
ज्ञानेश्वर मोळक , सहआयुक्त, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.