esakal | पुणेकरांनो, नाईट कर्फ्यूबाबत आलं अपडेट; पोलिस सहआयुक्तांनी काढले आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

Corona_Curfew

कोरोनाच्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना आणि मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

पुणेकरांनो, नाईट कर्फ्यूबाबत आलं अपडेट; पोलिस सहआयुक्तांनी काढले आदेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने संचार मनाई आदेश मार्च अखेरपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे नागरीकांना रात्री अकरा ते पहाटे सहा या वेळेत वैध कारणाशिवाय फिरता येणार नाही. तसेच रात्री विनाकारण फिरणाऱ्या नागरीकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा आदेश पोलिस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी दिला आहे. 

फेब्रुवारी आणि त्यापाठोपाठ मार्च महिन्याच्या सुरूवातीपासून शहरामध्ये कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभाग, पोलिस प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, या आजाराच्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना आणि मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

लॉकडाउन टाळायचा असेल तर...; काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे?​

संबंधित सूचना महापालिका क्षेत्रातही लागू करण्यात आल्या आहेत. तसेच रात्री संचार मनाई आदेश देण्यात आला होता. त्यानुसार, 15 मार्चपासून ते 31 मार्च 2021 या कालावधीपर्यंत शहरामध्ये रात्रीच्या वेळी संचार मनाई करण्यास मनाई करण्यात आली आहे, त्याबाबतचा आदेश डॉ. शिसवे यांनी दिला आहे.

दररोज रात्री अकरा ते दुसऱ्या दिवशी पहाटे सहा या वेळेत नागरिकांना वैध कारणाशिवाय बाहेर संचार करण्यास मनाई केली आहे. संबंधित आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय दंड विधान संहिता कलम 188, साथरोग अधिनीयम 1897 मधील तरतुदीनुसार शिक्षा असणार आहे, असेही डॉ. शिसवे यांनी स्पष्ट केले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image
go to top