esakal | दिलासादायक! पुणे शहरात दहा दिवसांत चार हजार खाटा झाल्या रिकाम्या
sakal

बोलून बातमी शोधा

Empty Beds

दिलासादायक! पुणे शहरात दहा दिवसांत चार हजार खाटा झाल्या रिकाम्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे शहरातील (Pune City) विविध रुग्णालयांत (Hospital) सध्या ३ हजार ६९३ कोरोना रुग्ण (Corona Patient) उपचार (Treatment) घेत आहेत. दहा दिवसांपूर्वी रुग्णालयांतील रुग्णांची हीच संख्या ७ हजार ७६८ इतकी होती. मागील दहा दिवसांच्या तुलनेत बुधवारी (ता.२६) शहरातील रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ४ हजार ७५ ने कमी झाली आहे. यामुळे अवघ्या दहा दिवसात शहरातील कोरोना रुग्णांच्या चार हजार खाटा (Bed) रिकाम्या (Empty) झाल्या आहेत. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या रुग्ण आकडेवारीच्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. (Pune City Four Thousand Beds were Empty in Ten Days)

दहा दिवसांपासून रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्या सातत्याने कमी झाली आहे. दहा दिवसांपूर्वीच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज ही आकडी निम्म्याहून कमी झाली आहे. शिवाय गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्याही सातत्याने कमी होऊ लागली आहे. सध्या गृहविलगीकरणातही केवळ ४ हजार ६६३ रुग्ण आहेत. दहा दिवसांपूर्वी हीच रुग्णसंख्या १० हजार ६७२ इतकी होती.ही संख्यासुद्धा निम्म्यापेक्षा जास्त आकड्याने कमी झाली आहे.

हेही वाचा: ESakal Survey : मोदी सरकारबद्दल करा तुमची 'मन की बात'

पुणे शहरातील दिवसांतील रुग्णांची संख्या १ मार्चला पाचशेच्या आत होती. मात्र तेव्हापासून ती सातत्याने वाढत गेली आणि हाच एक दिवसाचा आकडा साडेसात हजारांवर पोचला होता. त्यानंतर १५ मेपासून पुन्हा रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील पहिला कोरोना रुग्ण ९ मार्च २०२० रोजी पुणे शहरात सापडला होता. तेव्हापासून आजतागायतच्या शहरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या पावणेपाच लाखांच्या घरात पोचली आहे. यापैकी साडेचार लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ८ हजार २८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

अशी होत गेली कमी संख्या

- १७ मे --- ७७६८

- १८ मे --- ६४५८

- १९ मे --- ६३५६

- २० मे --- ६२३९

- २१ मे --- ६१३२

- २२ मे --- ६१०१

- २३ मे --- ६०३५

- २४ मे --- ४७०५

- २५ मे --- ३८१४

- २६ मे --- ३६९३