पुण्यात रात्री अकरा ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी | Night Curfew | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Night Curfew

पुण्यात रात्री अकरा ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी

पुणे : शहरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सोमवारपासून (ता.10) रात्री अकरा ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी (Night Curfew) असणार आहे. तर पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत जमावबंदी असणार आहे, असा आदेश पोलिस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे यांनी काढला आहे. त्यामुळे आता दिवसा पाचपेक्षा जास्त नागरीकांना एकत्र येण्यास मनाई असणार आहे, तर रात्री संचारबंदीमुळे नागरिकांना विनाकारण फिरण्यावर मर्यादा येणार आहे. (Pune City New Corona Rule)

राज्य सरकारने कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन शनिवारी रात्री नवीन नियमांबाबत आदेश जारी केले. त्यानुसार, पुणे पोलिसांनी रविवारी नवीन नियमांबाबतचे आदेश दिले. या आदेशाची सोमवारपासून अंमलबजावणी होणार आहे. डॉ.शिसवे यांनी दिलेल्या आदेशानुसार, 10 जानेवारीपासून पुढील आदेश येईपर्यंत दररोज रात्री 11 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे.

हेही वाचा: पुण्यात बाधितांपैकी फक्त ५.४८ टक्केच लोकं रुग्णालयात दाखल

या कालावधीमध्ये नागरीकांना ठोस कारण असल्याशिवाय फिरता येणार नाही. तसेच पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत शहरात जमावबंदीचे आदेश लागू असणार आहेत. त्यामध्ये पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही.

संबंधित आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड विधान संहिता कलम 188, साथरोग अधिनियम 1897 मधील तरतुदी व कायद्यानुसार शिक्षा असणार आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top