पुण्यात बाधितांपैकी फक्त ५.४८ टक्केच लोकं रुग्णालयात दाखल

रविवारी कोरोनाचे नवे ४,०२९ रूग्ण; तर एकूण संख्या १४ हजार ८९०
corona update
corona updatesakal Media

पुणे : शहरात कोरोना बाधितांच्या संख्येत रविवारी चार हजार २९ रुग्णांची (Corona Patient) भर पडली आहे. त्यामुळे शहरात आता १४ हजार ८९० सक्रिय रूग्ण असून त्यापैकी फक्त ५.४८ टक्के रूग्ण हे रूग्णालयात उपचार घेत आहे. रविवारी दिवसभरात ६८८ रुग्णांना घरी सोडण्यात आले तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. (Pune District Corona Updates)

कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकारामुळे देशात रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. बाधितांपैकी बहुतेकांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याने आता आरटीपीसीआर चाचणी नंतर जनुकीय क्रमनिर्धारण करणे बंद करण्यात आले आहे. शहरातही कोरोना निदान चाचण्यांनी वेग घेतला आहे. रविवारी शहरात १८ हजार १२ कोरोना निदान चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी चार हजार २९ रूग्ण बाधित सापडले आहे.

corona update
राहत्या घरी नव दाम्पत्याचे मृतदेह आढळल्यानं खळबळ; मृत्यूचं गूढ कायम

संक्रमनाचा दर जरी जास्त असला तरी गंभीर आजारी पडणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. बहुतेकांना सौम्य लक्षणे दिसत आहे. दाट लोकवस्ती, लहान घरे असलेल्या झोपडपट्टीच्या भागात कोरोनाच्या संक्रमणाचा धोका असला तरी प्रत्यक्षात या भागापेक्षा सोसायट्यांमध्येच कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण मोठे असल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. औंध, बाणेर, बालेवाडी, कोरेगाव पार्क, हडपसर, कोथरूड या भागातच बहुतांश रुग्ण असल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

पुणे मनपा हद्दीत आज ४ हजार ०२९ नवे कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. एकूण १४ हजार ८९० सक्रिय रुग्णांपैकी केवळ ५.४८ टक्केच रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. शिवाय आज केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून काळजी करण्याऐवजी काळजी घ्यावी, इतकंच.

- मुरलीधर मोहोळ, महापौर

corona update
AUS vs ENG: इंग्लंडच्या शेपटानं कांगारुंचा चौकार अडवला; मॅच ड्रॉ

आकडे बोलतात...

  • - शहरात उपलब्ध (रिक्त) व्हेंटिलेटर ः ५२६

  • - शहरातील उपलब्ध (रिक्त) ऑक्सिजन खाटा ः ३,९३८

  • - ऑक्सिजनवर असलेले रूग्ण ः १३४

  • - इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरील रूग्ण ः १६

  • - नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरील रूग्ण ः २३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com