आता बास झालं! विनाकारण फिरणाऱ्या पुणेकरांवर पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

- कोरोनाबाधीतांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभुमीवर पोलिसांकडून नाकेबंदीत मोठ्या प्रमाणात वाढ

- विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात

पुणे : शहरात लक्षणीयरित्या वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या पाहून पोलिसांनी आता नियमांची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी (ता.३) रात्रीपासून दररोज शहरात सर्वत्र नाकेबंदी करुन नागरीकांची कसून चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. त्याद्वारे शहरात रात्री विनाकारण फिरणाऱ्या नागरीकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.

- राज्यातील 'या' भागात पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्यानं दिला इशारा!

शहरात मागील काही दिवसांपासून कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दररोज 800 ते 900 पर्यंत कोरोनाबाधीत रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य, जिल्हाधिकारी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. मात्र संचार मनाई आदेश काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत असल्याचे आणि सार्वजनिक ठिकाणावर गर्दी करत असल्याचे चित्र आहे. तसेच प्रतिबंधित नसलेल्या भागात देखील रुग्णसंख्या वाढत आहे. 

- युवकांसाठी महत्त्वाची बातमी; आता पुणे झेडपीने सुरू केली 'कमवा व शिका' योजना!

या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने पुन्हा एकदा नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यास सुरुवात केली. त्यानुसार, पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम यांनीही रिक्षा, टॅक्सी व  चारचाकी वाहनांमधून मर्यादीत लोकांना प्रवास आणि लग्न, अंत्यसंस्कारासाठी देखील 50 लोकांनाच परवानगी देण्याचे पुन्हा एकदा ट्विटरद्वारे पुन्हा एकदा स्पष्ट करुन कडक कारवाइ करण्याचा इशारा दिला होता. 

- कोरोनामुळे संधी वाढल्या; वाचा पुण्यातील 'इंटरव्ह्यू मोका' कंपनीची यशोगाथा!

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्रीपासून पोलिसांनी शहरात पुन्हा नाकेबंदी करुन नागरिकांची चौकशी करण्यास सुरुवात केली. रात्री दहा ते पहाटे पाच या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य नागरिकांना संचार करण्यास मनाई आहे. असे असतानाही रात्रीच्यावेळी घराबाहेर पडणाऱ्या, शहरात विनाकारण फिरणाऱ्यावर संचार मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"नागरिकांनी कोरोनाची सद्यस्थिती समजून घ्यावी. अत्यावश्यक सेवा वगळता रात्रीच्यावेळी नागरीकांनी विनाकारण घराबाहेर पडु नये. आपण कुठल्या कामासाठी घराबाहेर जात आहोत, याचे पुरावे स्वत:जवळ ठेवावेत. नियमांचे काटेकोरपणे पालन करावे."

- डॉ.रविंद्र शिसवे, पोलिस सहआयुक्त.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune city police started enforcing strict action against civilians roaming in city at night without any reason