Pune city roads upgraded with fresh asphalt layers, reducing traffic hazards and improving commuter experience.
sakal
पुणे : रस्ते समपातळीत नाहीत, खड्डे व्यवस्थित बुजविले नाहीत, चुकीच्या पॅचवर्क वाहनचालकांचे कंबरडे मोडले अशी स्थिती असूनही पथ विभागाकडून दुर्लक्ष केले जात होते. पण महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पथ विभागाला १५ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत विशेष खड्डे बुजविणे मोहीम राबविण्यास सांगितले होते. एका महिन्यात २ हजार ९८९ खड्डे बुजविण्यात आले आहेत. तर १ लाख ८९ हजार चौरस मीटर इतके रस्त्यांचे क्षेत्र खरडून काढून तेथे डांबराचा नवा थर देण्यात आला आहे. त्यामुळे या किरकोळ दुरुस्त्यांमुळे रस्ते चांगले झाले आहेत.