pune traffic
sakal
पुणे - दिवाळीची सुटी संपून पुण्यात येणाऱ्या नागरिकांचा ओघ संध्याकाळी वाढल्याने शहरात येणाऱ्या सर्वच मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. सकाळपासून सुरू असलेल्या कोंडीत संध्याकाळनंतर मोठी भर पडली. त्यामुळे वाहनचालकांना दुपारी चारनंतर तारेवरची कसरत करत इच्छित स्थळी पोचावे लागले.