

School Timing Change
Sakal
पुणे : शहरात काही दिवसांपासून थंडीचा कडाका जाणवत आहे. विशेषत: सकाळी किमान तापमानात लक्षणीय घट होत असल्याचे दिसून येते. परिणामी लहान मुलांना थंडीचा कडाका सोसत शाळेत जावे लागते. म्हणून आता शहरातील काही शाळांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेत बदल केला आहे.