पुणे शहरातील पाणी मीटर टंचाई थांबली, साडे बारा हजार पाण्याचे मीटर उपलब्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water-Meter

पुणे शहरातील पाणी पुरवठ्यासाठी आवश्‍यक पाणी मीटरची मागील काही महिन्यांपासुन सुरु असलेली टंचाई आता दूर झाली आहे.

Water Meter : पुणे शहरातील पाणी मीटर टंचाई थांबली, साडे बारा हजार पाण्याचे मीटर उपलब्ध

पुणे - शहरातील पाणी पुरवठ्यासाठी आवश्‍यक पाणी मीटरची मागील काही महिन्यांपासुन सुरु असलेली टंचाई आता दूर झाली आहे. महापालिकेला साडे बारा हजार पाण्याचे मीटर उपलब्ध झाले आहेत. त्यानुसार, दररोज 100 ते 200 पाण्याचे मीटर बसविण्याचे काम महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडुन सुरु झाले आहे. तर येत्या काही दिवसात आणखी साडे बारा हजार पाण्याचे मीटर येणार आहेत.

महापालिकेकडून शहरात तीन लाख 8 हजार इतके पाणी मीटर बसविण्याचे निश्‍चित केले होते. त्यापैकी एक लाख 2 हजार पाणी मीटर घरगुती पाणी जोडला बसविण्यात आले होते. मात्र मागील काही महिन्यांपासून पाणी मीटरचीच टंचाई निर्माण झाल्यामुळे मीटर बसविण्याच्या काम संथ गतीने सुरु होते. आता महापालिकेला साडे बारा हजार पाणी मीटर उपलब्ध झाले आहेत. शहराच्या वेगवेगळ्या भागात दररोज किमान 100 ते 200 मीटर बसविण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून केले जात आहे. येत्या काही दिवसात आणखी साडे बारा हजार मीटर उपलब्ध होणार असून त्यामुळे पाणी मीटर बसविण्याच्या कामाला आणखी गती प्राप्त होणार आहे.

याविषयी महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, 'महापालिकेला सध्या साडे बारा हजार पाणी मीटर प्राप्त झाले आहेत, ते बसविण्याचे कामही सुरु झाले आहे. तसेच आगामी काही दिवसातही आणखी साडे बारा हजार पाणी मीटर उपलब्ध होतील. त्यातुन पाणी मीटर बसविण्याच्या कामाला अधिक गती प्राप्त होईल.'

टॅग्स :punewater