Water Supply close
पुणे - खडकवासला धरण ते पर्वती जलशुद्धीकरण केंद्र दरम्यान जलवाहिनी जोडणे, जलवाहिनीवर मीटर बसविणे या कारणासाठी गुरुवारी (ता. २०) बहुतांश संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद असणार आहे. शुक्रवारी (ता. २१) उशिरा कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू होईल, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.