पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी : गुरुवारी पूर्ण दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 March 2021

नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

पुणे : पुणे शहराच्या काही भागात तातडीचे पाईपलाईन देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्यामुळे गुरुवारी (ता.४) पूर्ण दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 

लष्कर जलकेंद्र आणि नवीन होळकर पंपिंग या भागात देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे संपूर्ण दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी सकाळी उशिराने आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे. 

रोहित पवारांचा मोदी सरकारला सल्ला; 'पेट्रोल-डिझेल दरवाढ आटोक्यात आणायचीय तर...'​

या भागात पाणी पुरवठा बंद राहणार
लष्कर जलकेंद्र भाग - 
लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणी नगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी

नवीन होळकर आणि चिखली विभाग -
विद्यानगर, टिंगरे नगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, नगर रस्ता परिसर

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune city water supply updates no water supply on Thursday