esakal | पुण्यात वाढला उन्हाचा चटका 

बोलून बातमी शोधा

पुण्यात वाढला उन्हाचा चटका }

पुणे शहर आणि परिसरात दोन दिवसांपासून आकाश अंशतः ढगाळ होते. त्यामुळे किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा १.१ अंश सेल्सिअसने वाढून १४.४ अंश सेल्सिअस नोंदला.

पुण्यात वाढला उन्हाचा चटका 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - पुण्यात कमाल तापमानाचा पारा वाढत असल्याने उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. शहरात कमाल तापमान ३६.१ अंश सेल्सिअस नोंदले असून, पुढील दोन दिवसांमध्ये दिवसाचे तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदले जाईल. त्यामुळे पुणेकरांनो, घरातून बाहेर पडताना सनकोट, टोपी, गॉगल बरोबर घ्या ! 

पुणे शहर आणि परिसरात दोन दिवसांपासून आकाश अंशतः ढगाळ होते. त्यामुळे किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा १.१ अंश सेल्सिअसने वाढून १४.४ अंश सेल्सिअस नोंदला. पुढील दोन दिवस दुपारपर्यंत आकाश मुख्यतः निरभ्र राहील. त्यामुळे उन्हाचा चटका कायम असेल. मात्र, दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविण्यात आली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातून थंडीने घेतला काढता पाय 
हवेतील बाष्प कमी झाल्याने कोरडे वातावरण तयार होऊ लागले आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांत थंडीचा प्रभाव कमी होऊ लागला असून, उन्हाचा चटका वाढू लागला आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रवाह कमी होत आहे. त्यातच अरबी समुद्राच्या पूर्वमध्य भाग आणि गोवा व कर्नाटकाच्या किनारपट्टीदरम्यान चक्रीय स्थिती आहे. राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत असून थंडी कमी-अधिक होत आहे. येत्या आठ दिवस काही ठिकाणी थंडी किंचित राहणार असली तरी मागील तीन ते चार दिवसांपासून हळूहळू कमी होण्यास सुरुवात झाली आहे. मध्यरात्रीनंतर काही प्रमाणात थंडी वाढत असली तरी पहाटे किंचित थंडी असते. सध्या राज्यातील सर्वच भागांत किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. चंद्रपूर, नांदेड वगळता राज्यातील सर्वच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. 

व्हिडिओ गॅलरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कोकणात थंडी कमी होऊ लागल्याने किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे किमान तापमान १९ ते २१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मध्य महाराष्ट्रातही थंडीत चढ-उतार असल्याने किमान तापमान ११ ते २१ अंश सेल्सिअस एवढे आहे. मराठवाड्यात थंडी गायब होऊ लागली आहे. किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. विदर्भात किंचित थंडी आहे. त्यामुळे किमान तापमानात घट आढळून येते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप