
पुणे - पुणे शहरासाठी पिण्याच्या पाण्यासाठी असलेला सध्याचा वार्षिक कोटा कायम ठेवण्याचा निर्णय शुक्रवारी (ता.२६) झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे सध्या तरी शहरातील पाणी कोट्यात कपात केली जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शहराचा पाणी कोटा कमी न करण्याची मागणी केली होती. दरम्यान, नीरा डाव्या कालव्यातून आणि खडकवासला प्रकल्पातून शेतीसाठी दोन उन्हाळी आवर्तने सोडण्याचेही या बैठकीत ठरले आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता.२६) व्हीहीआयपी सर्किट हाऊसमध्ये कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत हे दोन्ही निर्णय घेण्यात आले आहेत. बैठकीला कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार राहुल कुल, भीमराव तापकीर, दिलीप मोहिते आदी उपस्थित होते.
पुणे शहराला भामा आसखेडचे २.६ टीएमसी पाणी नव्याने मिळत असल्याने खडकवासला प्रकल्पातून मिळणारे तितकेच पाणी कमी करावे, असा प्रस्ताव जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मांडला होता. या प्रस्तावाला महापौर मोहोळ यांनी विरोध दर्शवत शहराचे पाणी कमी करू नये, अशी भूमिका मागणी केली.
महापौर मोहोळ म्हणाले, ‘‘पुणे शहराची लोकसंख्या, समाविष्ट गावांच्या पाण्याची गरज आणि भविष्यातील एकूणच गरज लक्षात घेता पुणे शहराची पाणीकपात करणे चुकीची आहे. सन २००१ मध्ये वार्षिक ११.५० टीएमसी पाणी शहराला उपलब्ध करून देण्याचा करार झाला होता. त्यानंतर हा पाणी कोटा वाढवून मिळण्यासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले. परंतु याबाबत अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. त्याउलट पाणीकपात करण्याची पुणेकरांच्या विरोधातील भूमिका जलसंपदा विभागाने घेतली आहे. सद्यःस्थितीत पुणे शहराला १८.५ टीएमसीची आवश्यकता आहे.’’
महानगरपालिकेचा पाणी गळती कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे. यानुसार २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेमुळे ही पाणीगळती कमी होणार आहे. शिवाय जायका प्रकल्पाच्या माध्यमातून सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी सिंचनासाठी वापरता येणार आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने आपली भूमिका मागे घ्यावी, अशी मागणी यावेळी मोहोळ यांनी केली.
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.