Pune Tree Cutting: पुणे महापालिकेकडून वृक्ष कायद्याचे उल्लंघन: ॲड. वंदना चव्हाण, गणेशखिंड रस्त्यावर ५०० हून अधिक वृक्षतोडीचा आरोप!

Vandana Chavan raises concern over violation of tree protection law in Pune city: गणेशखिंड रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली वारसा वृक्षांवर कुरघोडी, राज्य वृक्ष प्राधिकरणाची परवानगी न घेता महापालिकेवर कायदा मोडल्याचा आरोप
Vandana Chavan

Vandana Chavan

sakal

Updated on

पुणे: गणेशखिंड रस्त्यावर ५० वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान असलेले व ‘वारसा वृक्ष’ प्रकारात मोडणाऱ्या वृक्षांची संख्या जास्त आहे. वृक्ष संरक्षण कायद्यानुसार असे वृक्ष तोडण्यासाठी महापालिकेची नव्हे, तर राज्य वृक्ष प्राधिकरणाची परवानगी लागते. असे असतानाही, नियमांचे उल्लंघन करत महापालिका प्रशासन गणेशखिंड रस्त्याच्या रुंदीकरणाच्या नावाखाली पाचशेहून अधिक वृक्षांवर घाव घालत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या व माजी खासदार ॲड. वंदना चव्हाण यांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com