Pune Traffic : पुण्यातील रस्ते सुधारण्यासाठी महापालिका-महावितरणची संयुक्त समिती
Pune Update : पुण्यातील ३२ प्रमुख रस्ते आणि २० चौकांमधील वाहतूक सुधारण्यासाठी अडथळा ठरणारे विजेचे खांब आणि डीपी हटवण्यासाठी महापालिका आणि महावितरणची संयुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे : शहरातील प्रमुख रस्त्यावरील अडथळे दूर करण्यासाठी महापालिका आणि महावितरणची समिती स्थापन केली जाणार आहे. या माध्यमातून विजेचे खांब, डीपी यासह अन्य अडथळ्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.