

Pune Politics Heats Up As NCP Leader Sons Contest From Different Parties
Esakal
राज्यात महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अखेरच्या क्षणी बंडखोरी टाळण्यासाठी पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर न करता थेट एबी फॉर्म देण्यात येत आहेत. यामुळे मंगळवारी शेवटच्या दिवशी अनेक ठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होताना दिसतेय. तर काही ठिकाणी नाराजांचा संतापही दिसून येत आहे. पुण्यात अनेक चर्चेतल्या चेहऱ्यांना वेगवेगळ्या पक्षांकडून उमेदवारी देण्यात आलीय. यात काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या तर काही नेत्यांच्या कुटुंबीयांनाच तिकीट दिलं असल्याचं समोर आलंय.