Pune News : वारजे उड्डाण पुलाखाली कचऱ्याचे ढीग, ये-जा करणे त्रासदायक; दुर्गंधीने परिसरातील रहिवासी हैराण

Pune Civic Issues : वारजे मंगेशकर रुग्णालयासमोरील उड्डाणपुलाखाली साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी व अपघाताचा धोका वाढला असून, नागरिकांनी तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
Pune Civic Issues

Pune Civic Issues

Sakal

Updated on

वारजे : परिसरातील मंगेशकर रुग्णालयासमोरील उड्डाणपूल हा नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आला, मात्र आज या पुलाखालील रस्त्यावर जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले असल्याने येथे कचरा डेपो तयार झाल्यासारखे वाटते. वाहनचालकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने कचरा हटवावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com