

Pune's Prestige at Stake: Foul-Smelling Water on FC Road Sparks Public Outrage
esakal
शिवाजीनगर : पुण्यातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या फर्ग्युसन (गोपाळ कृष्ण गोखले) रस्त्यावर गेल्या तब्बल १५ दिवसांपासून सार्वजनिक मुतारीतील मूत्र व दुर्गंधीयुक्त पाणी थेट रस्त्यावर वाहत असून, या गंभीर प्रकाराकडे शिवाजीनगर-घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय आणि महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी अक्षरशः दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.