

The Pune Municipal Corporation is facing criticism over alleged preferential postings while hundreds of clerical staff continue to await transfers.
Sakal
पुणे : पुणे महापालिकेतील सुमारे साडेचारशे लिपिक संवर्गातील कर्मचारी बदलीच्या प्रतीक्षेत असूनही त्यांच्या बदलीचा निर्णय अजून झालेला नाही. पण सामान्य प्रशासन विभागाने काही खास कर्मचाऱ्यांच्या विशेष बदल्या करून त्यांना चॉईस पोस्टिंग दिली अन १०-१२ वर्षे सामान्य प्रशासन विभागात काम केलेल्या कर्मचाऱ्यांची पुन्हा याच खात्यात बदली करून त्यांना परत बोलावले आहे. गोपनीयपणे झालेल्या या बदल्यांनी कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.